सरपंचाने ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला ; गावकऱ्यांना मिळणार कमी दरात ‘ही’ सुविधा

कंधार (विशेष प्रतिनिधी) : निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना विकासकामांचे आश्वासन दिले जाते. परंतु, एकदा निवडणूक संपली की, आश्वासनांचा विसर पडतो. मात्र, कंधार तालुक्यातील जकापूर ग्रामपंचायतिच्या सरपंचाने मतदारांना दिलेले शब्द पळाला आहे. (The sarpanch kept his word to the villagers) 

 

 

सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पपतील जाधव यांच्या पॅनेलने ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना जी आश्वासन दिले. ते पूर्ण करण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन प्रयत्न करत आहेत. त्याची सुरुवात गावात पिठाची गिरणी सुरू केली असून, त्याचे उद्घाटन केले या गिरणीतून एक रुपया एक।किलो म्हणजेच पाच रुपये पायली या प्रमाणे दळणाचे दर आकारले जाणार आहेत. (The sarpanch kept his word to the villagers;)

 

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता मिळणार वाढीव मदत ; जाणून घ्या किती ?*
#शेतकरी #आर्थिक_मदत #अतिवृष्टी #शासन_निर्णय
👇👇 https://www.mhtimes.in/affected-farmers-will-now-get-increased-assistance/

 

कंधार तालुक्यात जाकापूर हे छोटेस गाव असून, गावाच्या एका बाजूला 2 किमी अंतरावर कौठा तर दुसऱ्या बाजूला दोन किमी अंतरावर गोणार गाव आहे. पावसाळ्यात या गावाचा संपर्क सातत्याने तुटतो, वीज पुरवठा ही सातत्याने खंडित होत असतो, त्याचा परिणाम लोकांना दळणासाठी कौठा आणि गोणारला जावे लागते. आता गावातच पिठाची गिरणी सुरू झाल्याने नागरिकांचे होणारे हाल थांबणार आहेत.

 

 

“मी जे बोलतो ते मी करतोच ह्या बोलण्याचे वचन म्हणजे निवडणूक होण्यापूर्वी गावातील सर्व जनतेसाठी ना नफा ना तोटा या धोरणातून गावातील ग्रामपंचायत मार्फत पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्याची पूर्तता केली आहे. पाच रुपये मध्ये पाच किलो दळण दिले जाणार आहे तरी सर्व गावातील जनतेने या चक्कीचा अवश्य लाभ घ्यावा.
– गोपाळ पाटील, सरपंच, जाकापूर 

गोपाळ पा. जाधव यांची सुरूवातीपासून सामाजिक कार्य करण्याची तळमळ. त्यासाठी उपसरपंच प्रतिनिधी माधव माली पा. पवार यांचा पाठिंबा मिळाला. आणि ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. त्यांनी जनतेस ग्रामपंचायतीत पिठाची गिरणी उभारणार असे वचन, आश्वासन दिले. आज दि. 23 आक्टोबर रोजी पिठाच्या गिरणीचे उद्घाटन करून नांदेड जिल्हयात एक आदर्श निर्माण केला आहे. 1 रू.ला एक किलो असा दर म्हणजे पाच रू. एक पायली माफक दराने ज्वारी, गहू दळण दळून दिले जाणार आहे. (The sarpanch kept his word to the villagers;)

Local ad 1