पुणे : नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (Backward Classes of Citizens) बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत चौकशीसाठी स्थापन केलेल्या समर्पित आयोगासमोर पुणे राजकीय पक्षांसह विविध 81 संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते नोंदवली आणि निवेदन सादर केली आहेत. (The role played by 81 parties and organizations before the dedicated commission)
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर (Pune, Sangli, Satara, Solapur and Kolhapur) जिल्ह्यातील ओबीसी संघटना, अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनीही निवेदने देत आपली भूमिका मांडली. आयोगाने निवेदने देण्यासाठी सकाळी 9.30 ते 11.30 अशी वेळ देण्यात आली होती. परंतु नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता दुपारी 1.30 वाजेपर्यंत निवेदने स्वीकारण्यात आली. (The role played by 81 parties and organizations before the dedicated commission)
Related Posts
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी अभिवेदन, सूचना मागविण्यात आल्या आहेत. (The role played by 81 parties and organizations before the dedicated commission)
समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया9Dedicated Commission Chairman Jayant Kumar Banthia), सदस्य महेश झगडे, डॉ. नरेश गीते, ह. बा. पटेल, सदस्य सचिव पंकज कुमार, डॉ. शैलेशकुमार दारोकार, प्रा.जेम्स (Dasya Mahesh Jhagde, Dr. Naresh Geete, h. Ba. Patel, Member Secretary Pankaj Kumar, Dr. Shailesh Kumar Darokar, Prof. James) यांच्या उपस्थितीत निवेदने स्वीकारण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माजी सनदी अधिकारी मोहन ठोंबरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच आयोगाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
पक्ष, सामाजिक संघटनांनी मांडली भूमिका
अखिल भारतीय कुंभार समाज संस्था,कुणबी समाज संघ पुणे,ओबीसी वेलफेअर फाउंडेशन, पुणे जिल्हा बारा बलुतेदार महासंघ, राष्ट्रीय छावा संघटना, अखिल भारतीय माळी समाज संघ, समता बेलदार समाज संस्था, कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबई, अखिल भारतीय बारी समाज महासंघ, अखिल भारतीय ओतारी समाज सेवामंडळ, मुस्लीम छप्परबंद भटकी विमुक्त विकास संस्था, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम महाराष्ट्र, राष्ट्रीय विणकर सेवासंघ, अखिल महाराष्ट्र सुतार लोहार महासंघ, कोलाटी डोंबारी समाज संघटना, ओबीसी वेल्फेअर फाउंडेशन पुणे, ओबीसी संघर्ष समिती, कुंभार समाज उन्नती मंडळ, अखिल भारती महात्मा फुले समता परिषद पुणे, न्यू सलून पार्लर असो., मराठा सेवक समिती, नाभिक विकास परिषद, शिंपी समाज मंडळ, सकल मराठा समाज सोलापूर, मराठा सेवा संघ सांगली, यासह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली.