Weather update । परतीचा पाऊस नांदेडसह ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार !

Weather update । पुणे : आता सर्वांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, याविषयी महत्वाचे अपसेट्स समोर येत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. आता पुन्हा परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . (The return rain in the state will be heavy)

 

 

परतीचा पाऊस १३ ते १७ ऑक्टोबर या काळात सुरू होण्याची शक्यता वर्तवत असताना हा पाऊस झाल्यावर चार दिवस परतीचा पाऊस संपूर्ण राज्यात होण्याचा अंदाज आहे. याशिवाय सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (The return rain in the state will be heavy)

 

 

कृषी विभागाचने प्राथमिक अहवालानुसार राज्यातील १४ जिल्ह्यांत अतिवृष्टी तथा पुरामुळे सहा लाख ५० हजार ३४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ज्वारी, बाजरी, कापूस, मका, सोयाबीन, ऊस, कांदा आणि फळ पिकांचा समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीची नेमकी स्थिती पुढे येण्यास मदत होईल. (The return rain in the state will be heavy)

 

दरम्यान, हवामानशास्त्र अभ्यासकांच्या मतानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत, तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकणात १ ते ३ ऑक्टोबरल परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (The return rain in the state will be heavy)

Local ad 1