मराठवाड्यातील “या” जिल्ह्यांना बसला भुकंपाचा (Quake)धक्का
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही - जिल्हाधिकारी
मुंबई ः विदर्भातील यवतमाळ तर मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याला जिल्हा प्रशानाने दुजोरा दिला असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
(The quake affected Yavatmal, Nanded and Hingoli districts around 8.30 am on Sunday.)
यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती. (4.4 magnitude earthquake shakes Yavat) हिंगोली, नांदेड जिल्ह्यातही भूंकपाचा धक्का (Earthquake also shakes Hingoli, Nanded district) जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.
नांदेडमधील तरोडा नाका, वाडी बु भागात घरातील वस्तू अचानक हलायला लागले. त्यावेळी नागरिकांना काय होतोय हे कळत नव्हते. भुकंपाचाच धक्का होता की नाही, याविषयी माहिती नव्हती. आम्हांलाच जणवल असेल असे वाटले, असे सलमा सय्यद या गृहिणीने सांगितले. (The quake affected Yavatmal, Nanded and Hingoli districts around 8.30 am on Sunday.)
रविवारी सकाळी 8 : 33 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती. मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
नांदेड शहरामध्ये छत्रपती चौक, फरांदेनगर, गोदावरी नगर, मालेगाव रोड, स्नेहनगर पोलिस काॅलनी, नालंदानगर, काबरानगर, एकतानगर फरांदेनगर, छत्रपती चौक वजीराबाद, सिडको, तरोडा, नवीन पुल, पूर्णा रोड आदी भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने घरातील खुर्च्या, पलंग हालल्याचे या नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर व कुरुंदा परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे धक्के यावेळी हिंगोली शहरापर्यंत जाणवले. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मात्र रविवारी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता, असे नागरिकांनी सांगितले. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, पोत्रा, वारंगा फाटा, दांडेगाव, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव या परिसरात हे धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.