पुणे उत्पादन शुल्क विभाग महिन्याला 70 ते 80 लाख रुपयांचा हप्ता वसूल करतो

रविंद्र धंगेकर आणि सुषमा अधारेंनी वाचून दाखवली वसूल केल्या जाणाऱ्या हप्त्याची यादीच

पुणे : तुम्ही खोटे बोलू नका. तुम्ही पाप करताय, तुम्हाला लय समजते का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख रुपयांचा हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे, असा गंभीर आरोप करत आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उप नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहेत. तुम्ही पुणे उदध्वस्त केले, अशा एकापाठोपाठ आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी उत्पादन शुल्कचे अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. यावेळी तुम्ही सांगताय ते माहिती चुकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर कोणाकडून किती हप्ता येतो, तो कोण गोळा करते, याची नावेच सांगितली. (The Pune Excise Department collects an installment of Rs 70 to 80 lakhs per month)

 

 

 

कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते गोळा करणाऱ्यांची नावे वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सुर्वे, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, अधीक्षक चरणसिंह राजपूत हे तुमच्या आशिवार्दाने हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर म्हणाले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.

 

 

पुण्यात दर 15 दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय? संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का?, असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना लक्ष्य केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री आणि आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे खडेबोल सुषमा अंधारे (Shiv Sena leader Sushma Andhare) यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावले.

 

 

दरम्यान, पुणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपुत यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच शहरातील बप, बार, रुफ टॉपवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाचे सहा पथके कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरात 108 बप, बार, रुफ टॉपवर करवाई करण्यात आली. तर गेल्या काही दिवसांत 54 बप, बार, रुफ टॉप सिल करण्यात आले आहे. गेल्य वर्षभरात अवैध दारु विक्री, वाहतूक, हातभट्टी दारु तयार, विक्री करणाऱ्यांवर आठ हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्ही बेकायदा दारु विक्री होऊनये, यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकिरी व कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. आमदार रविंद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल सर्व आऱोप पुणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपुत (Pune Excise Superintendent Charan Singh Rajput) यांनी फेटाळून लावले.

 

 

आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी कुठून किती येतो हप्ता वाचून दाखवले

द माफिया – 1 लाख रुपये

एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी 50 हजार रुपये

टू बीएचके- 1 लाख

बॉलर- २ लाख

राजबहादूर मिल्स बिमोरा- १ लाख

मिल्ट- १ लाख

टीटीएम रुफटॉप- ५ हजार

स्काय स्टोरी -५० हजार

जिमी दा ढाबा- ५० हजार

टोनी दा ढाबा- 50 हजार

आयरिश- ४० हजार

टल्ली टुल्स- ५० हजार

अॅटमोस्पिअर- 60 हजार

रुड लॉर्ड – ६० हजार

24 के- दीड लाख

कोको रिको हॉटेल- 71 हजार रुपये

 

Local ad 1