नांदेड : नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर असलेली रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी व त्या-त्या ठिकाणच्या जनतेला दळणवळणाच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने सर्व ठिकाणच्या भुयारी मार्गास मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MP Prataprao Patil Chikhlikar) यांनी दिली. (The problem of subway on the railway line in the district)
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन (Dr. Shankarrao Chavan Planning Building) येथे आज खासदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गासह ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या रेल्वे मार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलासह प्राधान्यक्रम देऊन तात्काळ कार्यवाही करू असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अश्वासीत केले आहे. केंद्रीय पातळीवरील नांदेड जिल्ह्यातील रस्ते वाहतूकीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल. याचबरोबर प्रदुषण मुक्त भारतासाठी नांदेड जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यात घरगुती गॅस पाईप लाईनने जिल्ह्यातील 8 लाख कुटुंबांना जोडले जात असून, यासाठी सुमारे 1200 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या बैठकीत सांगितले. (The problem of subway on the railway line in the district)
या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आदी योजनांचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्या-त्या योजनांबाबत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग प्रमुखांना सूचना केल्या. (The problem of subway on the railway line in the district)