...

रस्त्यावर पडलेला खड्डा 72 तासांत बुजवले जाणार ; सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केला तक्रारीसाठी मोबाईल ॲंप

पुणे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १,१८,००० किमी पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. विभागामार्फत राज्यातील तीन प्रकारचे रस्ते बांधले आहेत. त्यात प्रमुख राज्य महामार्ग (MSH), राज्य महामार्ग (SH) व प्रमुख जिल्हारस्ते (MDR) इ. सर्व रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात आणि त्यानंतर रस्त्यावर ; खड्डे पडतात, त्यामुळे भागात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सा. बां. विभागाच्यारस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरणासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली (PCRS) विकसित करण्यात आली आहे. हे ॲंप सर्व नागरिकांना सा. बां.विभागाच्या रस्त्यांवरीलखड्ड्यांसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देईल. तक्रार आल्यानंतर ते 72 तासांमध्येबुजवले जाईल, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण (Pune Division ChiefEngineer Atul Chavan ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (The pothole on theroad will be filled in 72 hours; Mobile app forcomplaints)  

मोबाईल ॲंप असा कराडाउनलोड

PCRS ॲंप http://mahapwd.gov.in/PMIS/PWPCRSCITIZEN.apk या लिंकचा वापर करून PWD वेबसाइटवरून आणि https://apps.mgov.gov.in/details?appid=१८४७ या डाउनलोड लिंकसह भारत सरकारच्या mSEVA अॅप स्टोअरवरूनडाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच GooglePlay store वर खालील लिंकसह कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल मध्ये स्थापित (Install) करता येईल. https://play.google.com/store/apps/details?id=com.cdac.pwd.citizen&hl=en-IN

 

ॲंपद्वारे खड्ड्यांसंबंधीच्या तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

 १) नागरिकांनी त्यांच्या Android फोनवर PCRS ॲंपस्थापित (Install) करावे. एकदा अॅपस्थापित झाल्यानंतर PCRS ॲंप करिता आवश्यक GPS आणि Storage करिता परवानग्या देण्यात यावेत.

2) या ॲंपमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका, तुम्हाला एसएमएसद्वारे वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल.लॉग इन करण्यासाठी कृपया हा OTP प्रविष्ट करा.

3) खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी ‘RegisterFeedback’ बटणावर क्लिक करा आणि आपला मोबाईल GPS च्या सहाय्यानेआपले वर्तमान स्थान दर्शवेल, त्यानंतर कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा, PCRS ॲंप आपला मोबाइलकॅमेरा उघडेल, त्यानंतर खड्ड्याचे छायाचित्र काढा व आपले तक्रार मोबाइल मार्फत टिप्पणीसहसबमिट करा.

4) तक्रार नोंदवल्यानंतर PCRS ॲंप सदर रस्त्याचे नाव, तालुका, साखळी क्रमांक इ. माहिती वरून संबंधित सा. बां.विभागाचे क्षेत्रीय अधिकारी ओळखेल, जर खड्डेबाबत तक्रार प्राप्त झालेला रस्ता हा सा. बां.विभागाच्या अखत्यारितील असल्यास सिस्टमद्वारे तक्रार क्रमांक तयार होईल व तसेनागरिक आणि संबंधित कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना एसएमएसद्वारे कळविले जाईल.

५) क्षेत्रीय कार्यालयकनिष्ठ अभियंता हे खड्डे दुरुस्त करतील आणि ७२ तासांच्या आत अँड्रॉइड ॲंपद्वारेउत्तर देईल. त्यानंतर क्षेत्रीय उपअभियंता कनिष्ठ अभियंत्याच्या उत्तराची पडताळणीकरतील आणि शेवटी १ दिवसाच्या आत नागरिकास अनुपालन सादर करतील व नागरिकांना एसएमएसद्वारे सूचित केले जाईल. नागरीक वेळोवेळी PCRS ॲंपवरुन त्यांच्या तक्राराची स्थिती पाहुशकतात.

६) ७ दिवसांपर्यंतच्याविलंबावर उपअभियंता स्तरावर देखरेख ठेवली जाईल, ७ ते १५ दिवसांच्या विलंबाची प्रकरणे संबंधितकार्यकारी अभियंत्याद्वारे पुनरविलोकन केले जाईल, १५ ते ३० दिवसांच्या विलंबाचे निरीक्षण संबंधितअधीक्षक अभियंता द्वारे केले जाईल व ३० दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधितप्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंताद्वारे पुनर्विलोकन आणि निरीक्षण केले जाईल.

Local ad 1