...

काय म्हणता..? ग्रामसेवक पद होणार रद्द, पुढे काय जाणून घ्या..

मुंबई : ग्रामसेवक हा सरपंच आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करताता. मात्र, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द होणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ (State Rural Development Minister Hassan Mushrif) यांनी दुजोरा दिला आहे. (The post of Gram Sevak, Village Development Officer will be canceled)

 

ग्रामसेवकाच्या माध्यमातून नागरिकांच्या जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंतची सर्व कागदपत्रे मिळतात. गावाचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या मदतीला असणारा सरकारी अधिकारी म्हणजे ग्रामसेवक असतो.  ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे पद आता रद्द होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पदे एकत्र करून त्याऐवजी आता एकच ‘पंचायत विकास अधिकारी’ हे पद तयार केले जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ग्रामसेवक संघटनेकडूनही तशी होत असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. (The post of Gram Sevak, Village Development Officer will be canceled)

 

 

दरम्यान ग्रामसेवक संघटनेच्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत एकच पद तयार करण्यासाठी नाशिक विभागीय उपायुक्त यांच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमण्यात आली. दोन्ही पदांची वेतणश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा अभ्यास ही समिती करणार आहे. त्यानुसार नवीन पदासाठी नियम ठरवले जाणार आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदे रद्द करुन नवे पद निर्माण करण्याची गरज, त्याची कारणमिमांसा ही समिती करणार आहे. (The post of Gram Sevak, Village Development Officer will be canceled)

Local ad 1