Nanded crime news । लव्ह बर्ड कॉफी शॉपमध्ये सुरु होता भलताच उद्योग

Nanded crime news । नांदेड : शहर आणि परिसारात काॅफी शाॅपचे प्रमाण वाढले असून, त्यात काॅफीच्या नावाखाली ‘नको ते उद्योग’ केले जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. कधी पोलिसांनी तर कधी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हे उद्योग उघड केले आहे. शहरालगत नव्याने विकसित असलेल्या परिसरात काॅफी शाॅपचे फॅड वाढले आहे. (The porn type started at the Love Bird Coffee Shop)

 

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुसलमानवाडी पाटी परिसरात बेकायदा सुरु असलेल्या ‘लव्ह बर्ड कॉफी’ शॉपमध्ये (Love birds coffee shop) अश्लील चाळे (Pornography) करणाऱ्या एका जोडप्याला आणि कॉफी शॉपच्या मालक सुनील मुकींदराव बेरूळकर (रा. चौफाळा, नांदेड) याला इतवारा उप विभागीय दामिनी पथक (Itwara Sub-Divisional Damini Squad) व नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोधपथकाने (Crime Investigation Squad of Nanded Rural Police) ताब्यात घेतले आहे. (The porn type started at the Love Bird Coffee Shop)

 

मुसलमानवाडी पाटी परिसरात विनापरवाना सुरु असलेल्या कॉफीशॉप सुरू असल्याची खात्रीशीर माहिती आठ ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळाली. रामीण ठाण्याचे प्रभारी पो. नि. अशोक घोरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि संकेत दिघे, पोलीस नाईक प्रमोद कन्हाळ, संतोष जाधव, पो. कॉ. विश्वनाथ पवार यांच्यासह इतवारा उपविभागीय दामिनी पथकाने ही कारवाई केली. (The porn type started at the Love Bird Coffee Shop)

Local ad 1