नांदेड जिल्ह्यात आजही कोरोना बाधितांची संख्या सातशे पार

नांदेड  : गुरुवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 234 अहवालापैकी 720 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 614 तर अँटिजेन तपासणीद्वारे 106 अहवाल बाधित आले आहेत. तर दुसरीकडे 527 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (The number of corona victims in Nanded district is still above 700)

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 133 एवढी झाली असून यातील 89 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 575 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.(The number of corona victims in Nanded district is still above 700)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे पिमप्रला हिंगोली येथील 84 वर्षे वयाच्या महिलेचा 19 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 430, नांदेड ग्रामीण 53, भोकर 2, देगलूर 26, धर्माबाद 1, कंधार 2, हदगाव 1, लोहा 12, मुदखेड 1, मुखेड 12, नायगाव 10, हिमायतनगर 4, बिलोली 1, माहूर 1, अर्धापूर 12, परभणी 13, हिंगोली 8, लातूर 4, उमरखेड 1, हैद्राबाद 5, जालना 1, जळगाव 1, आदिलाबाद 3, औरंगाबाद 2, केरळ 1, नाशिक 1, निजामाबाद 2, उस्मानाबाद 1, कर्नाटक 1, तेलंगणा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 24, धर्माबाद 28, हदगाव 3, लोहा 1, माहूर 5, मुखेड 6, नायगाव 10, उमरी 9 असे एकूण 720 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 463, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 50, खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 527 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (The number of corona victims in Nanded district is still above 700)

Local ad 1