पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख्या यावर्षातील सर्वाधिक (The number of corona patients in Pune city is the highest this year)

पुणे (PUNE) : कोरोना संसर्गाचा प्रभाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, मंगळवारी दिवसभरात 1 हजार 86 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. एप्रिल, 2020 मध्ये दिवसाकाठी वाढणारी कोरोनाबाधितांच्या संख्येची पुनरावृत्ती शहरात पुन्हा सुरू झाली की काय असे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.  (The number of corona patients in Pune city is the highest this year)

मंगळवारी शहरात सहा हजार 90 संशयितांनी कोरोनाची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आज सर्वाधिक पॉझिव्हिट रूगण आढळून आले असून, ही टक्केवारी 17.83 टक्के इतकी आहे. गेल्या काही महिन्यातील हा सर्वाधिक पॉझिव्हिटी रेट (positive rate) आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही सात हजारांच्या पुढे गेली असून, आजमितीला कोरोनाचे 7 हजार 20 रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 723 रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त 321 रूग्ण हे गंभीर आहेत. (The number of corona patients in Pune city is the highest this year)

 

शहरात आजपर्यंत 12 लाख 4 हजार 626 हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी 2 लाख 10 हजार 169 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 98 हजार 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी 5 जण पुण्याबाहेरील आहेत.  (The number of corona patients in Pune city is the highest this year)

Local ad 1