देशात सगळ्यात कठीण असलेली UPSC परीक्षा महाराष्ट्रातील 60 जण पास
- नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी 13 व्या आणि 44 व्या क्रमांकावर आहेत. (The most difficult UPSC exam was passed by 60 from Maharashtra)
एक नजर निकालावर
या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
- भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (खुला) – 14, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत. (The most difficult UPSC exam was passed by 60 from Maharashtra)
- भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (खुला) – 83, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 51, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 26, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 20 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. (The most difficult UPSC exam was passed by 60 from Maharashtra)
- केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 242 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) – 103, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 23, इतर मागास प्रवर्गातून – 68, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –17 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
- केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 90 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (खुला) – 36, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 08 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 25, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 06 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.