(Civil Services) महाराष्ट्र नागरी सेवा पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा, पुणे या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षणसंस्थेने प्रकाशित केलेल्या निवृत्त सनदी अधिकारी तथा मॅटचे माजी उपाध्यक्ष श्रीधर जोशी यांच्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम -1979’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांच्या हस्ते करण्यात आले. The Maharashtra Civil Services book
यावेळी यशदाचे निबंधक सुमेध गुर्जर, यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बबन जोगदंड, प्रकल्प सहायक संजीवनी रणदिवे उपस्थित होते. The Maharashtra Civil Services book
श्रीधर जोशी हे महाराष्ट्रातील शासकीय नोकरदारांना मोफत सहाय्य व सल्ला देऊन शासन सेवेतील अडीअडचणीसंदर्भात सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यांनी मॅटमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ सेवा केली आहे. महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील नियमांच्या संदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे. The Maharashtra Civil Services book
हे पुस्तक मे 2021 पर्यंत अद्ययावत केले असून या पुस्तकात संक्षिप्त टीपा, महत्त्वाची शासकीय परिपत्रके, शासकीयअधिकारी, कर्मचा-साठी मार्गदर्शक सूचना याने हे पुस्तक परिपूर्णअसून विभागीय चौकशी, शिस्तभंग विषयक प्रकरणे, अपील, वेतननिश्चिती रजा, किरकोळ कारवाई, लैंगिक छळाच्या तक्रारी, निलंबन या व अन्य महत्त्वपूर्ण प्रकरणांचा या पुस्तकात समावेश केला असल्याने हे पुस्तक कर्मचा-साठी दिशादर्शक आहे. The Maharashtra Civil Services book