राज्यात यावर्षी चांगले पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व येत्या पंधरवाडयात सदर पिक फुलोऱ्यावर येईल. शेतकरी बंधुना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील आठवडयात असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तूर पिकावर शेंगा पोखरणा-या अळयांमधे खालील प्रकारच्या अळयांचा समावेश होतो. (The larvae that feed on the pods on the trumpet)
शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा)
किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया अशा विविध रंग छटेत दिसुन येत असून तिच्या पाठीवर तुटक करडया रेषा असतात. मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. (The larvae that feed on the pods on the trumpet)
पिसारी पतंग
पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगांवरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून शेंगेतील दाणे पोखरते.
शेंगे माशी :
या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात.अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगेच्या आत राहून शेंगांतील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाणे खराब होतात. (The larvae that feed on the pods on the trumpet)
शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते कि, आपल्या पिकाची नियमित पाहणी करून सदर किडींच्या नियंत्रणासाठी खालील प्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगे माशी या तीनही किडी कळ्या, फुले व शेंगांवर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. (The larvae that feed on the pods on the trumpet)
प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळया खाऊन फस्त करतात.
पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना )
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एच.ए.एन.पि.व्हि.(१x१०९ पिओबी/मिली) ५०० एल.ई./ हे. किंवा बॉसिलस थुरिंनजिएंसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी)
इमामेक्टीन बेझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा लँब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
४. अळयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.