omicron | पुण्यातही ओमायक्रॉनचा शिरकाव ; पिंपरीत 6, पुण्यात 1 रुग्ण आढळला

पुणे : कल्याण डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा (omicron) एक रुग्ण आढळला. त्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पुणे शहरात एक तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. पिंपरीतील सहा जणांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत. तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. (The infusion of omicron in us too; Experiencing 6, patient 1 patient)

पुणे शहरातील 47 वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटूंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून 44 वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती. तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. (The infusion of omicron in us too; Experiencing 6, patient 1 patient)

नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे. या तिघींच्या 13 निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा 45 वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. (The infusion of omicron in us too; Experiencing 6, patient 1 patient)

Local ad 1