म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय, थांबा ‘हे’ बदल जाणून घ्या…
मुंबई : म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील (MHADA Housing Project) घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत बदल (Changes in income limits) करण्यात आला असून, अत्यल्प गटासाठी आता वार्षिक 6 लाख तर अल्प गटासाठी 6 लाख ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाने बुधवारी (25 मे) या संबंधीचा शासन निर्णय जारी केला आहे. (The income group for MHADA houses was changed)
मुंबई महानगर प्रदेश (Mumbai metropolitan region), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Region Development Authority) तसेच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू असणार, असे स्पष्ट करण्यात आले. (The income group for MHADA houses was changed)
उर्वरित महाराष्ट्रासाठी उत्पन्न मर्यादाही बदलण्यात आली आहे. त्यानुसार आता अत्यल्प गटासाठी वार्षिक 4,50,000 रुपये, अल्प गटासाठी वार्षिक 4,50,001 ते 7,50,000 रुपये, मध्यम गटासाठी वार्षिक 7,50,001 ते 12, 00,000 रुपये आणि उच्च गटासाठी 12, 00,001 ते 18,00,000 रुपयांपर्यंत अशी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (The income group for MHADA houses was changed)
दरम्यान उत्पन्न गटांनुसार सोडतीतील घराच्या अनुज्ञेय क्षेत्रफळातही बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार आता अत्यल्प गटातील घरांसाठी 30 चौ.मी., अल्प गटातील घरांसाठी 60 चौ.मी.पर्यंत, मध्यम गटातील घरांसाठी 160 चौ.मी. आणि उच्च गटासाठी 200 चौ.मी. असं क्षेत्रफळ यापुढे लागू असेल.(The income group for MHADA houses was changed)
नव्या बदलानुसार वार्षिक उत्पन्न मर्यादा किती?
अत्यल्प गट – वार्षिक 6,00,000 रुपये
अल्प गट – वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
मध्यम गट – वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
उच्च गट – वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये