(The highest number of corona patients in Nanded district)नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने उंच्चाकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी (दि.१२) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या तीन हजार १२३ पैकी दोन हजार ५०२ निगेटिव्ह आले आहेत. तर शनिवारी ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाढलेली रुग्णसंख्या पहता प्रशासनासह नांदेडकरांची डोकेदुखी वाढली आहे. (The highest number of corona patients in Nanded district)

शुक्रवारी अचानक ३६० रुग्ण वाढले होते. परंतु शनिवारी प्राप्त झालेल्या ५९१ अहवालाने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता.१२) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता.१३) तीन हजार १२३ पैकी दोन हजार ५०२ निगेटिव्ह, ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २६ हजार ३९१ इतकी झाली आहे. (The highest number of corona patients in Nanded district)

शनिवारी १७४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २३ हजार ५३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या दोन हजार २६ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. विशेष म्हणजे शनिवारी नांदेड महापालिकेंतर्गत ४७३, नांदेड ग्रामीण २२, हदगाव चार, मुखेड नऊ, लोहा २४, मुदखेड एक, धर्माबाद सात, नायगाव दोन, बिलोली एक, किनवट १८, माहूर नऊ, भोकर एक, अर्धापूर चार, देगलूर  सहा, कंधार तीन, उमरी एक, हिंगोली दोन, परभणी एक, यवतमाळ एक, लातूर एक, नागपूर  एक असे ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (The highest number of corona patients in Nanded district)

दरम्यान, अरविंदनगर नांदेड येथील महिला (वय ५८), सनमित्रनगर नांदेड महिला (वय ८९) यांच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात तर शिवाजीनगर नांदेड पुरुष (वय ७६), कलामंदीर नांदेड पुरुष (वय ५५) या दोन पुरुषांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना वरील चौघांचा शनिवारी मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६१४ इतकी झाली आहे. (The highest number of corona patients in Nanded district)

The highest number of corona patients in Nanded district
Local ad 1