पुण्यातील दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेण्यासाठी निघाले होते

पुणे. बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीस्थित एका कंपनीच्या मालकीचे हे हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफोर्ड काउंटी रिसॉर्ट येथील हेलिपॅडवरून (Oxford County Resort Pune Helicopter Booking) उड्डाण करत होते. पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या बावधन बुद्रुक येथील डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. अपघात झाल्यानंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि त्यात असलेल्या दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) मुंबईत घ्यायला जात होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास सुनिल तटकरे करणार होते. त्यासाठी पुण्याहून मुंबईसाठी हेलिकॉप्टर जात होते. काल हे हेलिकॉप्टर परळीत होते. (The helicopter that crashed was on its way to pick up NCP state president Sunil Tatkare)

 

अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस (Hinjewadi Police), अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांची पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त क्षेत्रात बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. परंतु, या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्या प्रमाणावर धुके होते. त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर (Helicopter Crash) इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता.

 

हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला.सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळी ला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला गेले होते. आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टर ने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणे सातच्या सुमारास या हेलिकॉप्टर ने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

 

ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन गिरीश पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे.  राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशीही माहिती आहे.

Local ad 1