...

(letter)राज्यपालांनी ‘या’ कारणांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलं पत्र

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षाच्या निवडीची आठवण करुन देत पाच आणि सहा जुलैला विधानसभेच पावसाळी आधिवेशनाची वेळ वाढवावी, तसेच ओबीसींचे आरक्षण प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेऊ नका, अशा अशयाचे पत्र लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. The Governor wrote a letter to Chief Minister Thackeray for ‘these’ reasons

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटले. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.The Governor wrote a letter to Chief Minister Thackeray for ‘these’ reasons

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचे घेतले जात आहे. अधिवेशन दोन दिवसांचे आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणत्या डेल्टा नाही ना कोणता व्हायरस. ज्या पद्धतीचे घोटाळे बाहेर येत आहेत, विद्यार्थी, महिला, आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, हे अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त कालावधीचे अधिवेशन घ्यायला लावावे, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. The Governor wrote a letter to Chief Minister Thackeray for ‘these’ reasons

विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त ठेवता येत नाही. मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवण हे संविधानाच अवमुल्यन करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात संविधानिक कारभार होत नाही हे तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, अशी मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलं, 40 ते 50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवले नाही. आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका असे सरकारने सांगितले होते, पण त्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. The Governor wrote a letter to Chief Minister Thackeray for ‘these’ reasons


Local ad 1