अमिता व प्रमिता कार्लेकर या मुलींनी वाढदिवसाचा खर्च टाळून पैसे दिले विधायक कामासाठी

नांदेड : वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो रुपये खर्च केला जातो. परंतु अमिता व प्रमिता एकनाथ कार्लेकर या जुळ्या मुलींना आपला वाढदिवसाला होणार खर्च टाळून सिडके येथील आंबेडकरवादी मिशनला स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांची भेट दिली आहे. (The girls Amita and Pramita Karlekar paid for the constructive work by avoiding birthday expenses)

 

 

 

इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या अमिता व प्रमिता कार्लेकर या जुळ्या भगिनींचा बुधवारी (दि.२५) जन्मदिन आणि भारतबाई वाघमारे व एम. टी. वाघमारे यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. अमिता व प्रमिताचे  मामा  एम. टी. वाघमारे यांच्या संकल्पना व प्रेरणेतून केक, हारतुरे व जेवण असा होणारा कार्यक्रम रद्द करून होणाऱ्या खर्चाचे बचत करून स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी केली. (The girls Amita and Pramita Karlekar paid for the constructive work by avoiding birthday expenses)

 

 

 

आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रंथ भेट देऊन बिना केक कापता एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला. या सामाजिक उपक्रमामुे या मुलींचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. (The girls Amita and Pramita Karlekar paid for the constructive work by avoiding birthday expenses)
Local ad 1