(The five percent) मुस्लिम आरक्षणासाठी एक पोस्टकार्ड मोहीम
पुणे ः मराठा आरक्षण आणि ओबीसी पदोन्नतीचा प्रश्न ज्वलंत आहे. दुसरीकडे मुस्लिम समाजाला न्यायालयाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाची अमंलबजावणी केली जात नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मुस्लिम आरक्षण (Muslim Rirveshan) आंदोलन, सकल मुस्लिम युवक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पोस्टकार्ड मोहीम गुरुवारी (दि.17 जून) राबविण्यात येत आहे. The five percent reservation to the Muslim community recognized by the court is not enforced.
मुख्यमंत्र्यांना पाठविल्या जाणाऱ्या पोस्टकार्डवर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा या प्रमुख मागणीसह मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा, मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा. प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे. बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी, एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी. मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी. The five percent reservation to the Muslim community recognized by the court is not enforced.