MPSC परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

नांदेड : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Announced the estimated schedule of MPSC examinations)

 

 

नांदेड जिल्ह्यात शनिवारी दारु विक्री बंद

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे. (Announced the estimated schedule of MPSC examinations)

अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे 

राज्य सेवा परीक्षा-2021 साठी जाहिरात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल मार्च 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. (Announced the estimated schedule of MPSC examinations)

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होईल.

 

संवेदनशील व महत्वाच्या “या” ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरणास बंदी

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल एप्रिल 2022 मध्ये जाहीर होईल.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सूचना

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-1 या पदासाठी मुख्य परीक्षा 9 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल. (Announced the estimated schedule of MPSC examinations)

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल. (Announced the estimated schedule of MPSC examinations) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी मुख्य परीक्षा 31 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.1 या पदासाठी मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

(Announced the estimated schedule of MPSC examinations)
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.2 लिपिक-टंकलेखक या पदासाठी मुख्य परीक्षा 13 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

(Announced the estimated schedule of MPSC examinations)
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 कर सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा 27 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 तांत्रिक सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा 10 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 उद्योग निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 17 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल जुन 2022 मध्ये लागेल.
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 29 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

 

 

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 16 एप्रिल 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 3 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

 

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 6 मार्च 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल एप्रिल 2022 मध्ये जाहीर होईल.

 

राज्यसेवा परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 15, 16 व 17 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये जाहीर होईल.

 

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात मार्च 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये जाहीर होईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपित्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात जून 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 8 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये लागेल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 संयुक्त पेपर क्रमांक-1 या पदासाठी मुख्य परीक्षा 24 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 31 डिसेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.

 

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2023 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी मुख्य परीक्षा 14 जानेवारी 2023 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात 2 जून 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 5 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
Local ad 1