Lok Sabha elections 2024 । जिल्हा प्रशासन लागलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला : मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्या !
Lok Sabha elections 2024 । सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार असून, त्याची सर्व जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आली. आगामी निवडणुकांमध्ये कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Brief Revision Program of Electoral Roll with Photograph) जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जून ते 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पुनरिक्षण पूर्व कार्यक्रम (Pre-Revision Program from 1st June to 16th October 2023) निर्धारीत केला आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत 17 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
हे अर्ज सादर करा
- नवीन मतदारांनी नमुना- ६ अर्ज सादर करावे (New electors should submit Form-6 application form)
- नाव वगळण्यासाठी नमूना-7 मध्ये अर्ज सादर करावे (Application form in Sample-7 should be submitted for omission of name)
- दुरूस्ती करावयाची असल्यास नमूना-8 सादर करा (Submit Specimen-8 if correction is required)