Compensation पीक विम्याच्या परताव्यानंतर आता नुकसान भरपाई बँकेत जमा होणार

Compensation नांदेड : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (To the affected farmers) शासनाकडून ७५ टक्क्यांनुसार ४५५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. ही आर्थिक मदतही लवकरच बँक खात्यात जमा होणार आहेत. (Will be credited to the bank account) मात्र, त्यासाठी बाधित शेतकऱ्यांचे बँक खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Nanded District Central Co-operative Bank) असणे आवश्यक आहे. (After the crop insurance refund, the compensation will now be deposited in the bank)

 

 

जिल्ह्यात मार्च ते सप्टेंबर (March to September) या कालवधीत अतिवृष्टीमुळे (Due to heavy rains) आठ लाख ६१ हजार ९१८ शेतकऱ्यांच्या सहा लाख सहा हजार ४६४ हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भरपाइसाठी शासनाकडून ६१२ कोटींचा निधी अपेक्षीत असून, यापैकी पहिला हप्ता म्हणून जिल्ह्याला ७५ टक्क्यांनुसार ४५५ कोटी ७२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने (District administration) हा निधी 3 नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे.  (After the crop insurance refund, the compensation will now be deposited in the bank)

 

पीक विम्याचा परतावा मिळाला ; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; तब्बल 57 रुपये प्रति गुंठा

 

नियोजन शून्य कारभाराचा फटका

    नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे  (Nanded District Central Co-operative Bank) शासनाकडून मिळणारे अनुदान आणि मदत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. परंतु त्यावेळी बँकेचा अनुभव चांगला नाही. असे असताना पुन्हा अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बकेमार्फतच तालुकास्तरावरुन हा निधी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

असा मिळाला निधी

मार्च, एप्रिल व मे या कालावधीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २० लाख ६५ हजार ७६० रुपये, जुलैमधील ७१ हजार २२९ बाधित शेतकऱ्यांच्या ४४ हजार ६०९.६० हेक्टर क्षेत्रासाठी ३० कोटी ३५ लाख ४६ हजार २८० रुपये तर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सात लाख ९० हजार ५३५ बाधित शेतकऱ्यांच्या पाच लाख ६१ हजार ७१९.२९ हेक्टर क्षेत्रासाठी एसडीआरएफप्रमाणे २९१ कोटी ७९ लाख ९० हजार ३७० व वाढीव प्रमाणे १३३ कोटी ५६ लाख ८१ हजार २४२ असे एकूण ४२५ कोटी ३६ लाख ७१ हजार ६१३ रुपये निधी वितरीत केला आहे.

 

Local ad 1