पुरात वाहून गेलल्या राठोड पिता-पुत्राचे मृतदेह आढळले

मुखेड Mukhed news : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Nanded district heavy rainfall) मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्याला पूर आला होता. या पुलावर आलेल्या पुरात एक कार वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. (The shocking incident took place when a car was swept away in the floods) त्यात तिघे प्रवास करत होते. त्या तिघांपैकी एकजण झाडाला धरून बसल्याने बचावला. तर अन्य दोघेजण वाहून गेले होते. या दोघांचेही मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आले. (The bodies of the father and son were found washed away in the flood) 

 

भगवान किशन राठोड (वय 68) व त्यांचा मुलगा संदीप भगवान राठोड (वय 38) असे पुरात वाहून गेलेल्या पितापत्रांचे नाव आहे. (Bhagwan Kishan Rathod and son Sandeep Rathod) तर राठेड यांचा सालगडी देवकते हा बचावला आहे. भगवान राठोड हे मुखेडचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांचे चुलत बंधू व संदीप हे पुतणे आहेत. (Mukhed MLA Dr. Tushar Rathore’s Bhagwan Rathod is a cousin and Sandeep is a nephew.)

 

 

भगवान राठोड यांची कार मंगळवारी पुराच्या पाण्यामुळे पुलावरून वाहून गेली होती. कालपासून त्यांचा प्रशासन आणि स्थानिक नागरिक शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुराचे पाणी ओसरले. त्यामुळे या दोघांचे प्रेत आज बुधवार दि. 8 रोजी सकाळी आढळून आले आहे. (The bodies of the father and son were found washed away in the flood)

Local ad 1