ऑटो सेक्टरला आले अच्छेदिन : दिवाळीपर्यंत ट्रेंड कायम रहाण्याची शक्यता !

Auto Sector : कोरोना साथीमुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी (Economic downturn) घोंघावत असल्याचे दिसून येत होते. मात्र, यंदाचा दसरा हा वाहन विक्रीसाठी बुस्ट ठरला आहे. 2021 च्या तुलनेत तब्बल 57 टक्क्यांनी विक्री वाढली आहे. तर दिवाळीतही (Diwali) विक्री चा (sale) ट्रेंड (Trend) कायम राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Achhe Din ः  The auto sector, the trend is likely to continue till Diwali)

 

गेल्या दोन वर्षांत वाहन बाजारात (Vehicle market) मंदी सदृश्य परिस्थिती होती. मात्र यंदाच्या नवरात्री त (Navratri) वाहन निर्मात्यांची (Vehicle manufacturing) खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे. कारण नवरात्रीच्या उत्सवात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची (Two wheelers and four wheelers) जबरदस्त विक्री झाली आहे. ज्यामध्ये नवरात्री 2021 च्या तुलनेत यावर्षी 57 टक्के  पर्यंत अधिक विक्री झाली आहे.

 

 

या कालावधीत सर्व सेगमेंट मध्ये (Segment) वाहन विक्रीत (Vehicle sales) मोठी वाढ झाली असून, दुचाकी चाकी, तीन चाकी, व्यावसायिक वाहने (Commercial vehicles), प्रवासी वाहने (Passenger vehicles) यांच्या विक्रीत अनुक्रमे 52 टक्के, 115 टक्के, 48 टक्के, 70  टक्के आणि 58 टक्क्यांनी वाढ झाली (Achhe Din ः  The auto sector, the trend is likely to continue till Diwali)

 

 

नवरात्री 2019 च्या तुलनेत म्हणजेच कोरोना साथ (Corona wave) येण्यापूर्वी  एकूण किरकोळ विक्री 16 टक्क्यांनी वाढली आहे. तर व्यावसायिक वाहने आणि 3 चाकी वाहनांसह दुचाकी वाहनांची विक्रीतही वाढ झाली. मात्र सर्वाधिक वाढ प्रवासी वाहनांच्या विक्रीत दिसून येत आहे. नवरात्रीमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 1,10,521 होती तर 2021 च्या नवरात्रीत 64,850 विक्री झाली होती. (Achhe Din ः  The auto sector, the trend is likely to continue till Diwali)

 

वाहन विक्री चा ट्रेंड दिवाळीपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, नव्याने दाखल होणाऱ्या वाहनांच्या खरेदीदारांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा वाहन उत्पादकांना आहे. (Achhe Din ः  The auto sector, the trend is likely to continue till Diwali)

Local ad 1