नांदेड : जिल्ह्यातील 92 लसीकरण केंद्रावर कोरना लसीकरण होणार आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तसेच कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस ही 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. Individuals between the ages of 30 and 44 will receive the corona vaccine
रविवारी मनपा क्षेत्रात 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगटासाठी पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांवर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत. Individuals between the ages of 30 and 44 will receive the corona vaccine
या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना श्रावस्तीनगर या 3 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. स्त्री रुग्णालय, दशमेश हॉस्पिटल येथे प्रत्येकी 80 डोस तर शहरी दवाखाणा हैदरबाग, जंगमवाडी येथे प्रत्येकी 70 डोस उपलब्ध करुन दिली आहेत. याठिकाणी 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.
उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी दिले जातील.
जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस तर 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.जिल्ह्यात 18 जून पर्यंत एकुण 4 लाख 78 हजार 177 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 19 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींसाठी पहिल्या लसीकरणाला तर कोविशील्ड व कोव्हॅक्सीनचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला उपलब्ध आहे. Individuals between the ages of 30 and 44 will receive the corona vaccine
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस सुरु करण्यात आला आहे. मनपा कार्यक्षेत्रात 30 ते 44 वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील.