Aapla Pune Marathon Season-4। पुनित बालन ग्रुप आयोजित ‘आपला पुणे मॅरेथॉन सीझन-4’ मध्ये होणार दहा हजार धावपटू सहभागी
Aapla Pune Marathon Season-4 । पुणे. पुनित बालन ग्रुपकडून (Punit Balan Group) आयोजित करण्यात येत असलेल्या ‘आपल पुणे मॅरेथॉन सीझन-४’ (Aapla Pune Marathon Season-4) मॅरेथॉनसाठी तब्बल दहा हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. पुणेकरांनी दाखविलेल्या या उस्फूर्त प्रतिसादामुळे ‘आपल पुणे मॅरेथॉन’ ही शहरातील सर्वात प्रतिष्ठित धावण्याच्या स्पर्धांपैकी एक बनली आहे. पुणे पोलिस, पिंपरी चिंचवड पोलिस, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमपीएमएल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेरॉथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील तरुणांनी तंदुरस्त रहावे आणि सकारात्मक जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. से नो टू ड्रग्स, येस टू रन’ हे मॅरेथॉनचे ब्रीदवाक्य आहे. खेळ आणि तंदुरुस्तीच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला चालना देणे आणि अंमली पदार्थ मुक्त जीवनाविषयी जागरुकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. (Ten thousand runners will participate in ‘Aapla Pune Marathon Season-4’)
असे असेल मेरॉथॉन स्पर्धेचे नियोजन
सामाजिक जबाबदारीसाठी विशेष शर्यत
आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा सत्कार
लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे
कॉम्रेड्स फिनिशर्सचा उत्सव
‘आपल पुणे मॅरेथॉन’ला प्रोत्साहन देणे म्हणजे केवळ धावण्याच्या स्पर्धेला प्रोत्साहन देणे नाही. हे एक निरोगी समाज निर्माण करण्याच्या दिशेने आणि पुण्यातील तरुणांना फिटनेसबद्दल उत्साही बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. पुणेकरांनी या स्पर्धेसाठी दाखविलेला प्रचंड प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणारा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकानां सर्वोत्तम सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप व मुख्य प्रायोजक.