(Ten killed by corona in Nanded district) चिंताजनक : नांदेड जिल्ह्यात दहा जणांचा कोरोनाने मृत्यू
नांदेड : जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Ten killed by corona in Nanded district)
शहरासह जिल्हयात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाला रोखण्यासाठी उद्या (मंगळवार) मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्यात अनेक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (Ten killed by corona in Nanded district)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील 70 वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील 47 वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील 90 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील 50 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील 68 वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक 20 ते 22 मार्च 2021 या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 658 एवढी झाली आहे. (Ten killed by corona in Nanded district)
सोमवारी 5 हजार 61 अहवालापैकी 3 हजार 390 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 33 हजार 7 एवढी झाली असून यातील 25 हजार 855 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 6 हजार 264 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. (Ten killed by corona in Nanded district)
बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 305, कंधार तालुक्यांतर्गत 3, माहूर तालुक्यांतर्गत 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 16, हदगाव 1, मुखेड 5, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 392 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्के आहे. (Ten killed by corona in Nanded district)
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 566, भोकर तालुक्यात 11, देगलूर 12, हदगाव 2, कंधार 1, लोहा 36, नायगाव 9, परभणी 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 21, बिलोली 5, धर्माबाद 17, हिमायतनगर 14, किनवट 23, मुखेड 33, उमरी 13, यवतमाळ 1, आदिलाबाद 2 असे एकूण 771 बाधित आढळले. ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 341, भोकर तालुक्यात 11, धर्माबाद 7, कंधार 7, लोहा 33, मुदखेड 37, नायगाव 6, परभणी 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 15, देगलूर 30, हदगाव 3, किनवट 6, माहूर 16, मुखेड 2, लातूर 2, आदिलाबाद 1 असे एकूण 520 बाधित आढळले. (Ten killed by corona in Nanded district)
जिल्ह्यात 6 हजार 264 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 188, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 99, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 15, किनवट कोविड रुग्णालयात 76, मुखेड कोविड रुग्णालय 125, देगलूर कोविड रुग्णालय 19, हदगाव कोविड रुग्णालय 43, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 20, माडवी कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 4, महसूल कोविड केअर सेंटर 102, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 112, खाजगी रुग्णालय 375 आहेत. (Ten killed by corona in Nanded district)
सोमवार 22 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. (Ten killed by corona in Nanded district)