...

तहसीलदारांना मिळाला मॅटमधून दिलास ; महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या का ठरतायेत चर्चेच्या ?

मुंबई : महूसल आणि इतर सर्व विभागाच्या बदल्या या मे अखेपर्यंत पूर्ण केल्या जातात. मात्र, यंदा त्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु महसूल मधील तहसीलदार, उप जिल्हाधिकाऱ्यांच्या (Tehsildar, Deputy Collector) मुदतपूर्व बदल्या केल्या आहेत. यानिर्णयाविरोधीत काही अधिकाऱ्यांनी मॅट मध्ये धाव घेतली. त्याठिकाणी त्यांना काहींसा दिलासा मिळाला. यंदाच्या ‘महसूल’मधील बदल्या ह्या सर्वाधिकत चर्चेच्या ठरल्या. (Tehsildars got relief from mat, transfer got adjournment)

 

 

सरकारच्या ‘गतिमान’ आणि ‘पारदर्शक’ कारभाराविरोधात अधिकाऱ्यांनीच’महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण’ (Maharashtra Administrative Tribunal) धाव घेतली. आपल्या बदल्यांवर ‘स्थगिती’ (adjournment) मिळवली आहे. त्यामुळे मॅटचे निर्णय राज्य सरकराला (State Govt) झटका मनाला जात आहे. महसूल खात्यामधील उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या करताना मर्जीतील अधिकाऱ्यांना ‘क्रिम पोस्ट’ (Cream post) किंवा सोयीचे ठिकाण देण्यासाठी जागा रिक्त व्हावी, म्हणून सध्या तेथे कार्यरत असलेल्या अधिका्यांची बदली प्रस्तावित करून त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्याचे आदेश जारी केला जात आहे. त्यांना तात्काळ पदभार स्वीकारायला सांगितले जात आले. (Tehsildars got relief from mat, transfer got adjournment)

पहाटे निघाले आदेश..

खात्यात यंदा बदल्यांमध्ये काहींसे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे २५ ते ३० अधिकारी वेटिंग फॉर पोस्टिंगवर (Officer Waiting for Posting) ठेवल्याची माहिती समोर आली आहे. कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. त्यापुर्वी त्याला कुठलीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे बदलीचा मेल पाठवून तात्काळ पदभार देण्याचे फर्मान सोडण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना मुदतपूर्व बदली ला सामोरे जावे लागले. ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या प्रकारामध्ये काही अधिकाऱ्यांना पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

 

वेटिंगवरील अधिकारी पोस्टिंग तर पोस्टिंगवर गेले वेटिंगवर..

वेटिंगवर असलेल्या अधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात आली तर त्याठिकाणी पोस्टिंगवर असलेल्या अधिकाऱ्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी संजय तेली (Deputy Collector Sanjay Teli) यांची बदली करून प्रतीक्षेत ठेवण्यात आले. त्यांच्या जागी दोन महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेले हिम्मत खराडे यांना पदस्थापना देण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (District Supply Officer Surekha Mane) यांना वेटिंवर ठेवून वेटिंगवर असलेल्या सीमा होळकर (Seema Holkar) यांना पदस्थापना देण्यात आली.

मॅटने केली बदली रद्द

महसूल शाखेचे तहसीलदार अजित कुऱ्हाडे (Tehsildar Ajit Kuhrade) यांच्या शासकीय सेवानिवृत्तीसाठी अवघा ११ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना, त्यांची बदली करण्यात आली. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नसल्याने खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे (Tehsildar Vaishali Waghmare) यांनीही मॅटचे दार ठोठावले होते. दोघांनाही दिलासा मिळाला असून, बदलीला स्थगिती मिळाली आहे.(MAT postpones transfers of officials in Maharashtra revenue department)

Local ad 1