(Tanmay fadnavis) तन्मय फडणवीस यांने हेल्थ वर्कर म्हणून घेतली लस

मुंबई ः माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांने कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला. त्यानंतर लस घेतानाचा फोटो त्यांने सोशल मीडियावर शेअरही केला. त्यावेळी तन्मयला लसीकरण कसे झाले, असा सवाल उपस्थित करत टिका करण्यात आली. त्यानंतर तन्मयने हा फोटो डीलिटही केला. आता त्यात मोठा खुलास झाला असून, तन्मय हा हेल्थकेअर वर्कर असल्याची नोंद माहिती अधिकारातून समोर आली. tanmay fadnavis is health workers

देशात दुसऱ्या टप्प्यात 45 वर्ष वयोगटापुढील लोकांना कोरोनाची लस दिली जात होती. त्या दरम्यान तन्मय फडणवीस याचे वय 25 असताना लस कशी देण्यात आली? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी तन्मय हा माझा दुरचा नातेवाईक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.  tanmay fadnavis is health workers

Tanmay fadnavis

 या संदर्भात बारामतीमधील सोमेश्वरनगर येथील रहिवासी नितीन यादव यांनी या संदर्भात माहिती अधिकारात ही माहिती मागितली होती. त्यांना सेव्हनहिल्स डी.सी.एच. मरोळ रुग्णालयाने उत्तर दिले आहे. त्यात लस घेत असताना तन्मय फ़डणवीस यांनी हेल्थकेअर वर्कर म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, तो नेमका कुठे आरोग्य सेवा बजावतो, याची कुठली ही माहिती त्यात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. tanmay fadnavis is health workers

Local ad 1