Talathi Bharti 2023 । तलाठी भरती ४,६४४ जागांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु ; पहिल्या तीन दिवसांत किती अर्ज दाखल झाले जाणून घ्या ?

Talathi Bharti 2023 । तलाठी भरती प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाकडून राबविण्यात येत असून, अर्ज दाखल करण्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या तीन दिवसांत सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, सुमारे पाच लाख अर्ज येतील, असा अंदाज आहे. त्यानुसार परिक्षेची तयारी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (Talathi Bharti 2023. Online registration for Talathi recruitment has started)

 

 

भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) टीसीएस या कंपनीची (TCS Company) भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली आहे. या कंपनीकडून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर हे दोन तारखांना परीक्षा घेण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन दिवसांपैकी एका दिवशी परिक्षा होण्याची शक्यता आहे. (Talathi Bharti 2023. Online registration for Talathi recruitment has started)

 

तलाठी पदासांठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

 

 

 

प्रत्येक जिल्ह्याकरिता स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता संपूर्ण राज्याकरिता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे.

 

महसूल विभागनिहाय तलाठी पदे

  • कोकण विभाग – 550 रिक्त पदे
  • नाशिक विभाग- 689 रिक्त पदे
  • पुणे विभाग- 602 रिक्त पदे
  • औरंगाबाद विभाग – 685 रिक्त पदे
  • नागपूर विभाग- 478 रिक्त पदे
  • अमरावती विभाग- 106 रिक्त पदे
Local ad 1