Talathi bharti 2023 | तलाठी पदासाठी अर्ज करताय ‘ही’ चूक टाळा ; अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल !

Talathi bharti 2023 :  महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरती राबविण्यात येत आहे.

Talathi bharti 2023 :  महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरती राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून, त्याची लिंक ओपन झाली आहे. मात्र, या भरतीमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करवा लागणार आहे. एका उमेदवारांनी एकपेक्षा अधिक जिल्ह्यांत अर्ज केल्यास त्या उमेदवाराला परीक्षेलाच मुकावे लागले, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. (Talathi bharti 2023 Avoid ‘this’ mistake while applying for Talathi post)

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांच्या सरळसेवा भरती करिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

 

राज्य शासनाने तलाठी संवर्गातील क गटातील पदे  सरळ सेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले. राज्यात एकूण चार हजार 464 तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाकडून अर्ज मागविण्याची लिंक खुली करण्यात आली आहे.

 

 

यापूर्वी घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रम निश्चित केला असून संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर आरक्षित प्रवर्ग करताना 900 रुपये परीक्षा शुक्ल असणार आहे.

 

Local ad 1