talathi bharti 2023। खुशखबर ! राज्यात साडेचार हजार तलाठी पदांसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये होणार परिक्षा

talathi bharti 2023 । शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार महसूल विभागाचा (Department of Revenue) प्रतिनिधी म्हणून तलाठी काम पहात असतो. परंतु रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांची (farmer) कामे मोठ्या प्रमाणात खोळंबतात. शेतकऱ्यांची गैरसौय होऊ नये, यासाठी राज्य शासनाने तलाठी पदभरतीचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्रारुप जाहिरात प्रसिद्ध (Format advertisement published) करण्यात आली असून, त्यानुसार राज्यात सुमारे 4 हजार 625 पदे भरली जाणार आहेत. (talathi bharti 2023 Exam for 4625 Talathi Posts in August to September?)

 

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत (Department of Revenue) तलाठी (गट-क) संवर्गातील राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांची माहिती (Information of 36 districts of the state ) मागविण्यात आली होती. त्यानुसार 4 हजार 625 पदे रिक्त असल्याचे समोर आले. ही पदभरती सेरळ सेवेतून होणार असून, यासाठी सर्व जिल्ह्यांत 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या काळात ऑनलाईन परिक्षा घेतली जाणार, असून, त्यासाठी ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, येणाऱ्या काळात सुस्पष्ट तारीख जाहीर केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (talathi bharti 2023 Exam for 4625 Talathi Posts in August to September?)

 

Tehsildars in Revenue Department । राज्यातील 74 तहसीलदारांची बदली ; कोणाची कुठे पदस्थापना जाणून घ्या..

 

उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार (Online application will be invited) असून, या पदासाठी कोण अर्ज करु शकतो. यासंदर्भातील सविस्तर माहिती ही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आले आहे. (talathi bharti 2023 Exam for 4625 Talathi Posts in August to September?)

 

पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात तरतुदी

कोणतीही नोकर भरती करताना पदसंख्येनुसार सर्व प्रर्गातील आरक्षण निश्चित करुनच भरती प्रक्रिया राबवावी लागते. तलाठी भरतीमध्ये पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार कमी किंवा वाढ होण्याची शक्यता असते. यात काही बदल झाल्यास त्याची माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (talathi bharti 2023 Exam for 4625 Talathi Posts in August to September?)

Local ad 1