...

चिपळूण येथे 45 हजार रुपयांची लाच घेणार तलाठी अटक

चिपळूण : चिपळूण उपविभागीय कार्यालयातून बिनशेती (एनए) असलेल्या जमिनीचे दोन समान हिस्से करून उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण (Chiplun Sub Divisional Officer Office) यांच्याकडून बिनशेती जमिन विभाजनाचा आदेश मिळवून देण्यासाठी 45 हजार रुपयांची लाचेची मागणी तलाठ्याने केली. लाचेची रक्कम तलाठी कार्यालय, पिंपळी खुर्द येथे पंचांसमक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. (Talathi arrested for taking bribe of 45 thousand rupees in Chiplun)

 

 

अश्विन नंदगवळी (Talathi Ashwin Nandgawali) (वय – 33 वर्षे, तलाठी, सजा – पिंपळी खुर्द (अतिरिक्त पदभार), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रार तक्रारदार व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे एनए असलेली जमीन आहे. त्यांना समसमाज दोन हिस्से करुन 7/12 वर नोंद घ्यायची होती. त्यासाठी चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयातून आदेशा घ्यावा लागतो. उपविभागीय अधिकारी यांचा आदेश (Order of the Sub-Divisional Officer) प्राप्त करून घेण्यासाठी उप विभागीय अधिकारी कार्यालयील कर्मचाऱ्यांसाठी 40 हजार रुपये आणि 7/12 उतारा वेगळा करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना देण्यासाठी पाच हजार रुपये, असे एकूण 45 हजार रुपयांची 1 जून रोजी मागणी केली.

 

ला. प्र. वि. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (Thane District Superintendent of Police Sunil Lokhande), अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, पोलीस उप-अधीक्षक सुशांत चव्हाण (Deputy Superintendent of Police Sushant Chavan) यांच्या मार्गदर्शनात सापळा लावण्यात आला होता. पथकात PI प्रविण ताटे, HC संतोष कोळेकर, PC हेमंत पवार,PC राजेश गावकर आणि PC प्रशांत कांबळे (चालक) यांचा समावेश होत.

Local ad 1