तलाठ्याच्या मुलाला लाच घेताना अटक
जालना : तलाठी, ग्रामसेवक तसेच अनेक शासकीय कार्यालयामध्ये काम करण्यासाठी दलालाची (एंजट) मदतीशिवाय काम होत नाही. तुम्ही कुठे पाहिलं का, एका तलाठ्याचा मुलगा एंजटगिरी करत असल्याची धक्कादायक माहिती सोमर आली. तलाठी वडीलांकडून काम करुन देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पडकले आहे. (TTalatha’s son arrested for taking bribe)
जालना जिल्ह्यातील सिरसवाडी इंदेवाडी सजाच्या तलाठी पदावर इंदुराव सरोदे कार्यरत आहेत. इंदेवाडी शिवारामध्ये तक्रारदाराचा एका मोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटची सातबारावर नोंद घ्यायची होती. तक्रारदाराला सरोदे यांचा मुलगा गौरव सरोदे (वय 28) याने वडीलांकडून फ्लॅटची सातबारावर नोंद करुन देतो, असे सांगून तीन हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
इंदुराव सरोदे यांच्या निवासस्थानी दुपारच्या वेळी सापळा रचला. ही रक्कम घेताना तलाठी आय.बी.सरोदे यांचा मुलगा गौरव इंदूराव सरोदे (वय 28) याला रंगेहात पकडले आहे. (Talatha’s son arrested for taking bribe)
दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सुटीच्या दिवशी जालना तालुक्यातील तलाठी संघटनेने उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांची भेट घेऊन जालनाचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे अपमानास्पद वागणूक देत आहेत, त्यामुळे त्यांची बदली इतरत्र करावी, तसे झाले तरच तलाठी काम करतील अन्यथा दिनांक 9 पासून सामूहिक रजेवर जातील असा इशारा दिला होता. त्यामुळे त्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईशी काही संबंध आहे का? याचा तपास एसीबी करत आहे. (Talatha’s son arrested for taking bribe)