NANDED ACB TRAP NEWS । महसूल विभागात खळबळ..! तलाठ्याने थेट फोन पे वर मागितली लाच

NANDED ACB TRAP NEWS नांदेड : पत्निला न्यायालयाच्या आदेशाने मिळालेल्या शेतीतील हिस्साची नोंद 7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठ्याने सात हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीतून सहा हजार रुपये फोन पे द्वारे पाठवा, असे सांगितले. यातून तलाठ्याने लाच मागितल्याचे सष्ट झाले. त्यामुळे तलाठ्या विरोधात तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (In Naanded district, Talatha demanded bribe directly on phone pay)

 

रूपेश देविदास जाधव (Talathi Rupesh Devidas Jadhav) (व्यवसाय नौकरी, पद- तलाठी, सज्जा शिवपुरी/तामसा, रा. मधु आस्था निवास, शाहु नगर, नांदेड) असे अटक केलेल्या तलाठी आरोपीचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मेव्हण्याची शिवपुरी, ता. हदगाव येथील शेत गट क्र. 104 मधील 1 हेक्टर 65 आर असलेल्या शेत जमीनी पैकी 40 आर शेत जमीन ही माहेरकडून न्यायालयाचे आदेशाने तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर फेरफार करून 7/12 वर नोंद घ्यायची होती. मात्र, त्यासाठी तलाठी रुपेश जाधव याने तुम्ही 7000 हजार रुपये द्या, तुमचे काम करुन टाकतो, सांगितले. मात्र, तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान यातील आरोपी जाधव याने तक्रारदार यांना तुमच्या मनाने एक हजार रूपये कमी द्या, असे म्हणून शासकीय पंचासमक्ष तडजोडीअंती 6,000 रूपयाची लाच मागणी करून मला फोन पे लगेच करा, असे सांगितले. त्यामुळे ही लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस स्टेशन तामसा, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

अँटी करप्शन ब्युरो नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे (Anti Corruption Bureau Nanded Superintendent of Police Dr. Rajkumar Shinde), पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सापळा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकामध्ये सपोउपनि गजेंद्र मांजरमकर, पोना बालाजी मेकाले, पोकॉ रितेश कुलथे, पोकॉ विनयकुमार नुकलवार, चापोह मारोती सोनटक्के आदींचा सहभाग होता.

Local ad 1