घरावर तिंरगा ध्वज फडकावताना ‘ही’ घ्या काळजी, संपूर्ण माहिती वाचा…
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त (Indian Independence Day) देशातल्या प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. (Har Ghar Tiranga – Azadi Ka Amrit Mahotsav) त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. ध्वजसंहितानुसार राष्ट्रध्वज हे हाताने काढलेले किंवा विणलेल्या लोकर, सूत, शिल्क खादी कपड्या (Khadi cloth) पासून बनवलेला असावा अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु केंद्र शासनाने या तरतुदीत बदल करून यात पॉलिस्टर कापडाचा (Polyester fabric) समावेश केला आहे. याचा फटका देशातील खादी उद्योगाला बसला आहे. (Take care while hoisting the tricolor flag on the house)
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर हर तिरंगा हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga – Azadi Ka Amrit Mahotsav) अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात तब्बल साडेसात लाख तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहेत. या अभियानात राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 24 तास ग्रामीण, शहरी, कुटुंब शाळा शासकीय कार्यालयावर (government office) दीड कोटी राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. (Take care while hoisting the tricolor flag on the house)
नांदेड येथील खादी ग्रामोद्योग समितीद्वारे निर्मिती करण्यात येणारा तिरंगा देशभरात पुरवठा केला जातो. मुंबईच्या मंत्रालयासह देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणाऱ्या राष्ट्रध्वजासह अखंड देशभरात नांदेडहून राष्ट्रध्वज पाठवला जातो. देशात कर्नाटक मधील हुबळी जि. धारवाड व नांदेड या दोनच ठिकाणाहूनच देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा होतो. नांदेड शहरात मराठवाडा खादी ग्रामउद्योग समितीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. सदरील राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून मागविले जाते. (Take care while hoisting the tricolor flag on the house)
नांदेडचा ध्वज फडकतो देशभर
राष्ट्रध्वज निर्मिती करताना राष्ट्रध्वजाचा कपडा, शिलाई, स्वच्छता, आकार, सौंदर्य, रंग या सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. कापड, दोरी, लाकूड, शिवणकाम आदी बाबत बारकावे तपासूनच तिरंगा ध्वज पुढे पाठविला जातो. देशातील महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तेलंगणा, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, चंदिगढ, पॉंडेचरी यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात नांदेड येथे निर्मिती केलेला तिरंगा ध्वज पाठविला जातो.
ध्वज फडकवण्याची नियम
प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचे पालन कराव. तिरंगा ध्वज फडकवताना केशरी रंग वरच्या बाजूला असावा. तिरंगा ध्वज काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा अभियान कालावधीनंतर दूध फेकला जाऊ नये तो सन्मानाने जतन करून ठेवावा. अर्ध झुकलेला फाटलेला कापलेला ध्वज कुठल्याही परिस्थितीत लावला जाऊ नये. (Take care while hoisting the tricolor flag on the house)
राष्ट्रध्वज तयार होणारी ठिकाणे
नांदेड , मुंबई ,ग्वालियर आणि हुबळी येथे राष्ट्रध्वज तयार होते. राष्ट्रध्वजाचा आकार लांबी रुंदी ( फुटात) असते. नागरिकांचे घरावर फडकविण्यासाठी (ग्रामीण व शहरी) 2×3 तर शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापना 4.5×3 असणे आवश्यक आहे.
राष्ट्रध्वज फडकावताना खालील गोष्टी लक्षात घ्या..
ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर डकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये. कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये. ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.
ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील. राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसेच पाण्यावर तरंगलेला नसावा. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसेच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये. जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.तुमच्या घरी ध्वज फडकावण्याचा विचार करत असाल तर हे नियम नक्की लक्षात घ्यावेत.