दिवाळीमध्ये वीज सुरक्षेची अशी घ्या काळजी !

पुणे : दिवाळी सणाच्या कालावधीत विद्युत सजावट,रोषणाई (Electrical decoration, lighting) तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीज यंत्रणेसोबत घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणापासून सतर्क राहावे. कोणत्याहीप्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहनमहावितरणने केले आहे. (Take care of electricity safety during Diwali)

 

 

महावितरणचीवीज यंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघु दाबाच्या उपरी वीजवाहिन्या,रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोकानिर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिट जवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेट सारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेत फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आगलागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ ताससुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

 

दिवाळीसाजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सतर्क राहावे. घराच्या किंवाइमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊशकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशकंदीललावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्याइन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये. आकाश कंदिल किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्री पीनचा वापर न करतावायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने खोचले जातात.त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्कींग सुरु होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅलरीमधीललोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासूनविद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंघ असावी. तुटलेलीकिंवा सेलोटेपने जोडलेली नाही याची खात्री करून घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

 दिवाळी प्रकाशमान करा : सर्वसामान्या प्रमाणेच महावितरण सुद्धा एक ग्राहकचआहे. महसूलासाठी अन्य कोणताही मुख्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने वीजबिलांच्या वसुलीतून सर्व प्रकारची देणी भागवावी लागतात. पुणे प्रादेशिक विभागात सध्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- २०३ कोटी ११ लाख रुपये (८,२६,७६८), सातारा २२ कोटी ५१ लाख (१,९३,३०९), सोलापूर- ५२ कोटी १५ लाख (२,७१,०४४), सांगली- २८ कोटी ९९ लाख (२,२३,२४८) आणि कोल्हापूरजिल्ह्यात ३२ कोटी ३ लाखरुपयांची (२,४८,३०२) थकबाकी आहे. थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यामुळे ग्राहकांनी संपूर्ण थकबाकीचा भरणा करून सुरळीत वीजपुरवठासाठी अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणची दिवाळी प्रकाशमान करावी असे आवाहनपुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे (Regional Director Ankush Nale) यांनी केले आहे.

 

Local ad 1