विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्रास देणार्यावर कारवाई करा : जिल्हाधिकारी डॉ. इटनकर
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसाग्रस्त शेतकर्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी शेतकर्यांनी विमा कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.