पुणे : बालकांच्या व्याधीप्रतिकार शक्तीसाठी तसेच बुद्धी – स्मृती वर्धनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झालेला आयुर्वेद शास्त्रातील सुवर्ण प्राशन संस्कार सर्व मुलांपर्यंत पोहचावा या उद्देशाने नांदेड सिटीतील ओंकार आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयातर्फे (Onkar Ayurveda Panchakarma Clinic in Nanded City) मोफत सुवर्ण प्राशन शिबिर गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ तिथीवर आयोजित करण्यात आले होते. त्यात 0 ते 12 वर्षे वयोगटातील 200 पेक्षाही अधिक मुलांनी सुवर्ण प्राशनाचा लाभ घेतला आहे. (Suvarna Prashan Camp by Onkar Ayurveda Panchakarma Hospital)
Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषदेत मोठी पदभरती होणार ; अभ्यासक्रम, पॅटर्न झेडपीच ठरविणार
सुवर्णप्राशनाचे फायदे (Swarn Prashan drop benefits)सुवर्णप्राशनम् हि एतत् मेधाग्नि बलवर्धनम् |आयुष्यं मंगलम् पुण्यम् वृष्यम् वर्ण्यम् ग्रहापहम् ||मासात् परम् मेधावी व्याधीभिर्नच धृष्यते |षडभिरमासै: श्रुतधर सुवर्णप्राशनात् भवेत् ||
- सुवर्ण प्राशनाने रोगप्रतिकार शक्ति वाढते.
- ऐकण्याची, बोलण्याची क्षमता वाढते.
- बुद्धी, स्मरणशक्ती व आकलनशक्ति वाढते.
- पचनशक्ती सुधारते, भूक वाढते व पोट देखील व्यवस्थित साफ होते.
- त्वचेची कांती सुधारते.
- ऊंची व वजन वाढण्यास मदत होते.
- दात येताना होणारा त्रास कमी होतो.
- शब्द स्पष्ट उच्चारले जातात, शब्द ग्रहण क्षमता वाढते.
- हवामान बदलामुळे होणार्या आजारापासून बचाव होतो.