...

नियमबाह्य टेंडरची कामे न केल्याने अधिकारी निलंबन, अधिकाऱ्यांने मुख्यमंत्र्यांकडे मागितली दाद

पुणे : आमदार, खासदार, मंत्री (MLA, MP, Minister) अधिकाऱ्यांना नियबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकतात. त्यामुळे अधिकारी नाविलाजाने अनेकवेळा कामे करतात परंतु भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात काही अधिकारी दाबाला बळी पडत नाही. अशा अधिकाऱ्यांना मुदतपूर्व बदली किंवा निलंबना सारख्या  कारवाईला सामोरे जावे लागते. एका मंत्र्याने सांगितलेले नियमबाह्य कामे न केल्याने एका वर्ग-१ च्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्या अधिकाऱ्यांने थेट मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली आहे. (Suspension of officer for not performing illegal tender works)

 

मी पुण्याचा आराेग्यप्रमुख असताना एका मंत्रयाने मला पुण्यातील कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यासाठी दबाव आणला होता. परंतू मी नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. म्हणून हे निलंबन मागे घ्यावे, असे पत्र महापालिकेचे निलंबित आरोग्य प्रमुख डाॅ. भगवान पवार (dr bhagwan pawar) यांनी मुख्यमंत्री यांना पाठवून निलंबन रदद करावे, अशी विनंती केली आहे.

 

दहावीच्या निकालाची तारीख जाहिर ; कधी लागणार जाणून घ्या

डाॅ. पवार यांचे आर्थिक अनियमितता व स्त्री कर्मचारी लैंगिक छळ या जुन्या प्रकरणांची फाईल काढून त्यांना आराेग्य खात्याने निलंबित केले आहे. निलंबनानंतर डाॅ. पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव यांना पत्र लिहून त्यांना संबंधित मंत्रयाने नियमबाहय काम करण्यास नकार दिल्याने महापालिकेचे आरोग्य प्रमुख हे पद रिक्त करण्यासाठी जुन्या तक्रारीचा आधार घेऊन चौकशी समिती स्थापन करून चौकशी न करताच निलंबन करण्यात आल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला आहे. याआधीही त्यांची बदली करण्यात आली हाेती आणि त्या बदली विरोधात मॅट मध्ये दावा दाखल केला होता.त्याठिकाणी डाॅ. पवार यांच्या बाजुने निर्णय लागला. त्यानंतर डाॅ. पवार पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख म्हणून काम पाहत होते.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात डाॅ. पवार म्हणाले,सार्वजनिक आरोग्य विभागातील सेवेला ३० वर्ष झाली आहेत. उत्कृष्ट काम केल्याने गौरविण्यातही आले आहे. पुणे महापालिका आरोग्य विभागात कार्यरत असताना कोणतीही गंभीर तक्रार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. महापालिका आयुक्तांनी कामकाजाबाबत प्रतिकूल शेरा दिलेला नाही. माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून तक्रारींमध्ये तथ्य नसतानाही हेतुपुरस्करपणे मंत्र्यांच्या दबावामुळे निलंबन करण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कात्रजमध्ये कार्यालय असलेला ताे मंत्री काेण?

पत्रात डाॅ. पवार यांनी संबंधित मंत्रयाचे नाव घेणे टाळले असून त्यामुळे कात्रजमध्ये कार्यालय असलेला ताे मंत्री काेण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच त्या मंत्रयावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Local ad 1