ब्रेकिंग न्यूज : मराठा समाजाचे सर्वेक्षण नऊ दिवसांत पूर्ण होणार ; कधीपासून सुरु होणार सर्व्हेक्षण जाणून घ्या…
प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार असून, यासाठी आयोगाने प्रशासनाला 23 ते 31 जानेवारी या दरम्यान सर्व्हेक्षण पूर्ण करा, अशा सूचना दिल्या आहेत. (Breaking News: Survey of Maratha community to be completed in nine days)
मुंबई : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याच्या जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगाला (State Backward Class Commission) सोपविण्यात आली. त्यानुसार आता प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार असून, यासाठी आयोगाने प्रशासनाला 23 ते 31 जानेवारी या दरम्यान सर्व्हेक्षण पूर्ण करा, अशा सूचना दिल्या आहेत. (Breaking News : Survey of Maratha community to be completed in nine days)
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले असून, आता ते मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत. सरकारकडून त्यांना आंदोलन करु नये, सरकार मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल, असे आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आजपर्यंत असे अश्वासन मिळाले. मात्र, आरक्षण मिळाले नाही.
राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेले प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगावर (State Backward Class Commission) सोपविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रर्वगाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्वेक्षणाची कार्यपद्धती सांगण्यासाठी 20 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या आणि महापालिकेच्या मुख्यलयाच्या ठिकाणी तालुका आणि वार्डस्तरीय प्रशिक्षकांना साॅफ्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 21 आणि 22 जानेवारीला प्रशिक्षण घेणारे अधिकारी हे तालुक्यातील आणि वार्डातील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना देतील. तर 23 जानेवारीपासून प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारीच्या आत पूर्ण करायचे आहे. विशेष म्हणजे सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोगाचे ओळखपत्र दिले जाणार असल्याचे आयोगाचे सदस्य सचिव आ.उ. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.