सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. तर गायक अभिजित सावंतला (Singer Abhijit Sawant) दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. (Suraj Chavan became the winner of Boss Marathi reality show) बिग बॉसच्या ट्रॉफीवर सूरजने (Suraj Chavan) आपले नाव कोरले आहे. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफी जिंकली आहे. सूरज विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचेही अनेकदा कौतुक झाले आहे. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षा तो वरचढ ठरला होता.
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घराबाहेर पडली. त्यानंतर अंकिता वालावलकरला घराबाहेर जावं लागल. टॉप चार स्पर्धकांतून धनंजय बाहेर पडला. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. अखेर प्रेक्षकांनी निर्णय देत सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता केले आहे.
कोण आहे सूरज चव्हाण ?
मूळचा बारामती तालुक्यातील असलेला सूरज हा टिकटॉकमुळे (TikTok) प्रसिद्ध झोतात आला होता. पण असे असले तरीही सूरजचे वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेले आहे. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडीलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आले. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.
बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असे अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आले आहे. पण बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केले. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.