Sunday Special । गावराण चिकनचा झणझणीत रस्सा बनवायची रेसिपी

Sunday Special । कोंबडा आणि बोकड मटनाला (Chicken, Goat Mutton)  खवय्ये पंसती देतात. तर आपण आज आपण झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची रेसिपी पाहूया.. सर्व प्रथम आपण त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची मात्रा किती असते. (Sunday Special. Gavran chicken gravy recipe)

अर्धा किलो चिकण (मध्यम आकाराच्या मटन तुकडे) घ्या.. त्यासाठी ५ ते ६ कांदे, अर्धा वाटी लसून पाकळ्या, एक मोठा तुकडा अद्रक, ७ ते ८ काळी मिरी, ३-४ विलायची,५-६ लवंग, एक चमचा खसखस, चवीनुसार मीठ, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, एक चमचा धना पावडर, २-४‌ तेजपाता, दालचीनी, खोबरं, आवश्यकतेनुसार तेल, तीन ते चार टमाटो, मोठे दोन चमचे दही, कोथिंबीर, पाणी आवश्यकतेनुसार घ्या. तसेच भाजीला झणझणीत करण्यासाठी मसाल्यातील दगडी फुल, पाढरे तिळ आवश्यकतेनुसार तसेच गरम मसाले घेऊन त्याला भाजून घ्या. (gavran chicken recipe in marathi)

आत भाजी कशी बनवायची ते जाणून घेऊया..

  • आधी मटणचे तुकडे करुन घेऊन ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. मटन धुऊन घेतल्यानंतर त्यावरती दोन चमचे हळद आणि चवीनुसार मीठ आणि लसूण अद्रक पेस्ट दोन चमचे लावून मटणाच्या प्रत्येक तुकड्याला बरोबर लावून ते उकडायला ठेवा. 10 ते 15 मिनिटं चिकण शिजवून घ्यावे.
  • जर तुम्ही चिकण-मटण हे पातेल्यामध्ये बनवत असाल तर त्यावरती ताट झाकून ताटेवरती पाणी ठेवून मधून-मधून थोडं थोडं पाणी त्यामध्ये घालावे, यामध्ये मटण शिजण्यासाठी थोडा वेळ लागेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही चिकण-मटण कुकरमध्ये झटपट बनवणार असाल तर तेलामध्ये चिकण-मटण टाकल्यानंतर थोडा वेळ ते चिकण-मटण परतून घ्यावे व त्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकून कुकरचे झाकन लावून घ्यावे. चिकण-मटण शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्याव्या.
  • जो खडा मसाला तव्यावरती भाजून घेतला आहे ,त्याला थोडं थंड करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यावे .याचबरोबर साईडला खोबरे भाजलेले बारीक करून घ्यावे. खोबरे आणि खडा मसाला हा मिक्सरमध्ये एकत्र बारीक करू नये हा वेगवेगळा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा व त्यानंतर कांदा जो भाजलेला आहे, त्याच्या वरचा पाचोळा काढून भाजलेला कांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा याचबरोबर आपला काळा मसाला तयार झाला असेल ,जो भाजलेला खडा मसाल्याचा काळा मसाला तयार केला आहे त्याचा सुगंध व चव ही मटणाची चव वाढवतात.
  • चिकण-मटणाची भाजी म्हटलं तर थोडा वेळ तर लागणारच त्यामुळे झणझणीत रस्सा भाजी करताना सर्व स्टेप हळुवारपणे कराव्यात यामुळे चिकण-मटण चांगली चव येईल. चला तर मग भाजीला शेवटचा तडका म्हणजेच फोडणी द्या.
  • गॅस वरती मोठं पातेलं ठेवून त्यामध्ये रोजच्यापेक्षा थोडं जास्त तेल घालावे , तेल थोडं गरम झालं असताच भाजलेला कांदा जो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तो घालावा, कांदा हा तेलामध्ये कमीत कमी दहा ते बारा मिनिट चांगला परतून घ्यावा जेणेकरून कांद्यामधून पाणी संपून तेल बाहेर आलं पाहिजे जेव्हा कांदा चांगला परतून घेतला जाईल तेव्हाच चिकण-मटणाला चव येते .

 

 

 

Local ad 1