Suicide। धक्कादायक ! नांदेडमध्ये बस वाहकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

नांदेड  : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदेलन सुरु असून,नांदेड शहरात एका वाहकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल. भीमराव नागोराव सदावर्ते (वय 57) (Bhimrao Nagarao Sadavarte) असे आतमहत्या केलेल्या वाहकाचे नाव आहे. (Suicide by hanging of bus conductor in Nanded)

 मुंबईत ओमायक्रोनचे आढळले ’इतके’ रुग्ण

प्राप्त माहितीनुसार सदावर्ते हे किनवट आगारामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. परंतु कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे एसटीचे चाक जाग्यावरच थांबलेले आहेत. आंदोलन आणि सरकारची अडमुठ्या भूमिकेमुळे कर्मचारी तणावत आहेत. 25 डिसेंबर रोजी रात्री उशिरा वसरणी परिसरातील ‘जयहिंद’ पार्कमधील पत्र्याच्या खोलीत सदावर्ते  यांनी गलफास लाऊन आत्महत्या केली. दरम्यान, सदावर्ते हे त्यांच्या सहकारी-कर्मचाऱ्यांच्या दुखवटा व आंदोलनात सहभागी होते. किनवट आगारातील बस वाहक दिवंगत सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील नांदेड जिल्ह्यातील दुसरे बळी ठरले आहेत. (Suicide by hanging of bus conductor in Nanded)

नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

 

याप्रकरणी नागेश भीमराव सदावर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. महेश कोरे व त्यांचे सहकारी कर्मचारी याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (Suicide by hanging of bus conductor in Nanded)

Local ad 1