वाढदिवसाचा खर्च टाळून देशभक्तीचा असाही प्रत्यय ; पर्यावरणीय जागृतीचेही प्रयत्न 

पुणे : आजकाल वाढदिवस म्हटलं, की रात्री उशिरापर्यंत फटाके उडवणे, समर्थक आणि मित्रांसह गल्ली-बोळांत जोरात वाहने चालवून केक कापणे असे प्रकार केले जात आहेत. मात्र या अनिष्ट प्रथा टाळत प्रभाग क्रमांक १८ येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रल्हाद गवळी यांनी देशभक्ती आणि पर्यावरणीय जागृतीचा प्रयत्न केला आहे. 

 

 

 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दी काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या शो चे आयोजन प्रल्हाद गवळी यांनी केले होते. (Such a suffix of patriotism by avoiding birthday expenses)

 

 

वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून गवळी यांनी आपल्या परिसरातील लहान मुले, युवक आणि नागरिकांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला.  (Such a suffix of patriotism by avoiding birthday expenses)

 

 

शिवाय, वाढदिवसानिमित्त कोणीही केक, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणता त्याऐवजी प्रत्येकाने एक रोपटे द्यावे. ते आपण लवकरच पालखी मार्गाच्या दुतर्फ़ा लावणार आहोत. आतापर्यंत सुमारे १ हजार रोपटे संकलित झाले आहेत, असे गवळी यांनी सांगितले. (Such a suffix of patriotism by avoiding birthday expenses)

 

 

प्रल्हाद गवळी म्हणाले, आजच्या तरुणांत राष्ट्रभावना निर्माण होणे महत्त्वाचे आहे. शिवाय पर्यावरणीय जागृती निर्माण होण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. येत्या काळात आणखी समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातील. (Such a suffix of patriotism by avoiding birthday expenses)
Local ad 1