पुण्यात गरीबांच्या तोंडात ‘नासका’ तांदुळ ; शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी अन्न धान्य पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलवर शिजवला भात
पुणे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार लाडकी बहिण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) आणली. त्या मार्फत महिलांच्या बँक खात्यात थेट 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना महिलांसाठी किती चांगली आहे, असे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, दुसरीकडे रेशन धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य निकृष्ट आहे, की सकस हे पाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना गेल्या वर्षी आयएसओ 9001 (ISO 9001) मानंकान बहाल करण्यात आले. मात्र, त्यातून वितरीत केले जाणारे धान्य सकस असले पाहिजे, याकडे लक्ष देण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ नाही. पुणे शहरा रेशन दुकानावरून नागरिकांना निकृष्ट धान्य वितरीत केले जात आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेच अन्न धान्य वितरण अधकाऱ्यांच्या टेबलवर त्या तांदळाचा भात शिजवत आंदोलन केले आहे. (Substandard rice is being distributed through ration shops)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अकरा परिमंडल असून, त्यांच्या मार्फत रेशन दुकाने चालवले जात आहेत. ऑगस्ट महिन्यांचे धान्य दुकानांमध्ये पोहोचला असून, त्याचे वितरण सुरु आहे. गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील तांदुळ मिलमधून आलेला तांदुळ निकृष्ट दर्जा आहे. तो जनावरेही खाउ शकत नाही, असा तांदुळ गरीब व गरजू कुटुंबांना वितरीत केला जात आहे, असा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
रेशन दुकानातून (Ration shop) वितरित केला जाणारा तांदुळ हा खान्यासाठी योग्य नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party) कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांना रेशनवर मिळालेले तांदुळ पुणे शहर अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या टेबलवरच शिजवला आहे. यावेळी काही लाभार्थी महिलाही कार्यालयात उपस्थित होत्या. त्यांनी रेशन दुकानातून मिळणारे धान्य निकृष्ट असून, दुकानदार उडवाउडवी उत्तर देत आहे. तसेच कमी धान्य देत असतो, असा आरोप केला आहे.
शिवसेनेच्या (उबाठा) वतीने अधिकारी प्रशांत खताळ यांच्या टेबलवरच तांदुळ शिजवत त्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी दुकानांना पुरवठा केलेले तांदुळ परत मागवला जाईल, असे आश्वासन खताळ यांनी दिले. दुकानात उपलब्ध असलेले तांदुळ वितरीत करु नका, ते बदलून मिळेल, असे सांगितले आहे. मात्र, ज्या नागरिकांनी तांदुळ घरी घेऊन गेले आहे, त्यांच्याकडून परत घेता येणार नाही, असे प्रशांत खताळ यांनी स्पष्ट केले आहे.
लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला देता. पण त्यांना रेशन दुकानातून दिले जाणारे धान्य कसे आहे, हे पाण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांना वेळ नाही. आता वितरत केले जात असलेले तांदुळ जनावरांना ही खाऊ घालू शकत नाही, एवढा निकृष्ट तांदुळ आहे. हे तांदुळ परत न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे (उबाठा) जावेद खान यांनी दिला आहे.
भात खाण्यास अधिकाऱ्यांनी दिला नकार
रेशनवर मिळत असलेला निकृष्ट तांदळाचा भात आंदोलकांनी शिजवला. त्यानंतर तो भात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांना खाण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी तो तांदुळ निकृष्ट दर्जा असल्याचे सांगत नकार दिला. तसेच रेशन दुकांनावर दिलेला तांदुळ परत मागवले जाईल, असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) जावेद खान, साकीब आबाजी, सारिका जाधव, श्रद्धा भिसे, मयुरी रासकोंडा, वाजिद शेख, शुभम पन्हाले, दीपक चौहान यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद
रेशन दुकांनाना तांदूळ निकृष्ट दर्जाचा पुरविण्यात आला असून, तो तांदुळ घेण्यास लाभार्थी नकार देत आहेत. असा निकृष्ट तांदुळ तुम्ही कशाला आणला, असे सांगत वाद घालत आहेत. त्यामुळे हे वाद टाळण्यासाठी दर्जेदार तांदळाचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
– गणेश डांगी, अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना पुणे.
तांदुळ निकृष्ट नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा
भंडारा येथून दोन महिन्यांचा सुमारे 8 हजार मेट्रीक टन तांदूळ आलेले आहे. त्याचे वितरण सुरु आहे. त्यातील शेटवटचा लॉट असून, त्यात काही तांदुळ निकृष्ट असल्यास दुकानदांराना वितरीत करु नये सांगण्यात आले आहे. सरसकट तांदुळ निकृष्ट नाही, असा दावा पुणे शहर अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ (Pune City Food Grain Distribution Officer Prashant Khatal) यांनी केल आहे.