petrol and diesel price । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर अभिनेता सुबोध भावे संतापला

Petrol and diesel price । पुणे : गेल्या काही वर्षांत सोने आणि चांदीचे दर वाढले. त्याचा परिणाम असा झाला की, ते सर्वसामान्यांचा आवाक्या बाहेर दागिने गेले. सोने, चांदीचे दागिने हे हौस म्हणून वापरले जातात. परंतु आता पेट्रोल आणि डिझेलच तसं नाही. कारण प्रत्येकाशी निगडीत असलेले हे पदार्थ आहेत. यावर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पेट्रोल आणि डिझेलने सोनं आणि चांदीचा माज उतरवलं, अशा शेलक्या शब्दात संताप व्यक्त केला आहे.  (Actor Subodh Bhave expressed anger over petrol and diesel price hike)

सुबोध भावे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो, सतत असं वाटायचं की, या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही ….. कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद” (Actor Subodh Bhave expressed anger over petrol and diesel price hike)

Subodh Bhave. 1pg
Subodh Bhave. 1pg

पुणे शहरात रविवारी पेट्रोलचे दर  109 रुपये 62 पैसे प्रतिलीटर तर डिझेल 98 रुपये 50 पर्यंत पोहोचले आहेत. हे  दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. या दरवाढीचा परिणाम एकंदरीत महागाईवर होत असतो. यावर कोणीही बोलायला तयार नाही, असे चित्र असतानाच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांने निषाना साधला आहे. (Actor Subodh Bhave expressed anger over petrol and diesel price hike)

 

 

 

Local ad 1