नांदेडच्या विद्यार्थ्यांची किंग बॉक्सिंग, कराटे स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

नांदेड : औरंगाबाद (Aurangabad) येथे नुकत्याच पारपडलेल्या युथ गेम काउंसिलच्या (Youth Games Council) कराटे आणि किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Nanded students win gold in King Boxing, Karate competition)

 

 

नांदेड येथील अमोल शिवाजी खंदारे या विद्यार्थ्याने 17 वर्षे 50 किलो वजन गटात कराटे आणि किकबॉक्सिंग प्रकारात रोप्य पदक (सिल्वर) पटकावले आहे. 19 वर्षे 50 किलो गटात तेसज सिद्धार्थ इंगोले याने किकबॉक्समध्ये सुवर्ण तर कराटे मध्ये कांस्य पदक (ब्राँझ) पटकावले. तर रणवीर गणेश कोंडीबा या विद्यार्थ्याने 21 वर्षे वयोगटात सुवर्ण पदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. (Nanded students win gold in King Boxing, Karate competition)

 

चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंचे कामगार सेनेचे बाळासाहेब पाडवे, युथ गेम काउंसिल नांदेडचे अध्यक्ष संजय पंधिरवाड, विष्णू पुर्णे, निलेश खारटे आणि कराटे किक बॉक्सिंगचे मुख्य प्रशिक्षक गौस शेख यांनी सत्कार करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. (Nanded students win gold in King Boxing, Karate competition)

 

Local ad 1